एक श्रुंगार... एक थरार..💐

एक श्रृंगार ! एक थरार ! ' गिर ' अभयारण्यात एका बंगलीतून बघत होते .... एक रम्य पहाट !जंगल घनदाट !सुवर्ण सहस्र रश्मि व रिमझिम रेशिम धारांची मंत्र पुष्पांजलि, मंद पवन पावा , अन् अलवार मृद् गंध,निसर्गाने सारा साज .. श्रृंगार केलेला ...
ही सुवर्ण संधी साधून ,हरित पानात ,सोनसळी उजेडात सळसळलं !!
५' लांबीचे दोन काळपट लाल रंगाचे दोन नाग समोरासमोर बसून सरी्ंच्या पुंगीवर डोलू लागले ! फणा काढून एकमेकाना बिलगत होते, ! फुत्कारत होते ... आवेश ... आवेग ... लसलस ...फसफस .... थरथर ...
उंच च उंच उसळ्या ... अलिंगने ... कमनीयता ... भावुकता ... चपळता ... आतुरता ... डौल,दिमाख मी नजरेत साठवत होते! मी पुतळा बनले होते!
सारे सारे स्तब्ध! निरव शांत !
माझ्या  हातून पर्स पडली ! प्रेमी युग्मास माझी चाहुल लागताच , ते सळ्कन् झाडाआड गेले !
'प्रणय ' ही सहज स्वाभाविक भावना! पण मिलनाच्या अत्युच्च क्षणीचा संयम त्या हिंस्र पशु त दिसला !
आश्चर्यजनक!!!
फेब्रुवारी मास ... प्रेम मास! आपण प्रेम जरूर व्यक्त करुया ,पण भवतालचे भान राखुया ! दर्जा राखुया ...
स्वत:ला आवरुया ... सावरुया ....
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme