# काळ आला होता.. पण...

#काळ आला होता.. पण..
यावरील कथास्पर्धेचा निकाल लागला होता..
वरूण ला पहिले बक्षीस मिळाले. टाळ्यांचा कडकडाट झाला.. व वरुण कथा वाचू लागला...

"26जुलै 2005 .. मुंबईला.. मिठी नदीने मगरमिठी मारली... हाहाकार ..
तळमजल्यावर.. एका घरात.. अनिता काँटवर व तिचे तान्हुलं.. खाली गादीवर झोपले होते.
अनिता तापाने फणफणली होती.
त्यांच्या कडे एक तगडे.. मजबूत.. उंच धिप्पाड.. शिकारी.. अन् शिकलेले कुत्रे होते.

तिने त्या कुत्र्याला सांगितले...
" लुसी ,बाळाकडे लक्ष दे.. मी पण जरा पडते."
तिला झोप लागली. पावसाचे तांडव सुरू झाले. पाणी आत शिरले. लुसी भुंकली.. अनिता चिडून...
" लुसी.. Shut.. up!!!जरा झोपूदे !"
काही क्षणातच पाणी बाळाच्या गादीजवळ आले.
जनावरांना संकटाची चाहूल लागते...
संरक्षणाचे पाऊल आपोआप उचलले जाते.

 पाणी आत .. आत.. गादीजवळ आलेले पाहून.. लुसीने शर्टसह बाळाला तोंडात धरुन अनिताच्या अंगावर ठेवले.

ती खाड्कन जागी झाली. तिला गदगदून आले. तिने बाळाला व जीवनदात्या लुसीला ह्रदयाशी धरले.. घळघळ अश्रू वाहू लागले..

वगैरे .. वगैरे.. कथा वरुण वाचत असताच..
तेथे अनिताचा मुलगा राजन आला..
माईक हाती घेऊन म्हणाला..
" ही कथा माझ्या घरात घडलेली व आमच्या गाडगीळ टिचरने लिहीलेली आहे.
दै. सकाळ च्या मुक्तपीठ मध्ये छापून आलेली आहे..  ही कथा.. आमच्या गाडगीळ मँडम नी लिहीलेली आहे..  मँडमनी आम्हा पुरग्रस्तांना आसरा दिला.. तेंव्हा माझ्या आईने त्यांना हा प्रसंग सांगितला.. आम्हाला त्यावेळी मँडम नी आधार दिला.. मग ही कथा लिहीली "

खरेच आहे... स्वतः मेहनत करून न लिहीता.. दुसऱ्याचे लेख.. कथा.. कविता.. आपल्या नावावर पाठवणे... बक्षीस लाटणे.. काँपी.. पेस्ट मुळे तर हे प्रमाण जास्त च वाढत चालले आहे... हे एकप्रकारे चौर्य होय...
पण कधी ना कधी पितळ उघडे पडतेच हे लक्षात घेऊन...
श्रावणासम.. सलील धारा बनुया...
सखोल विचार करुन.. स्वच्छ.. सुंदर स्वविचार मांडत राहुया..
पौर्णिमेच्या चंद्रासम... उजळुया..
उन्नती गाडगीळ 💐

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme