नभी चांदणे हासरे....खुलवी..

नभी चांदणे ... हासरे ...
खुलवी ... बाळ .. गोजिरे  ।
गगनी .. उडती ... पाखरे ...
बांधती ... झाडावरी घरे ।
मानव उभा .. भू.वरी ...
आकांक्षा ... अंबरी ।
सावली .. उंच वृक्षाची ...
गूज करे .. बुंध्याशी ।
फुल फुले ... वेलीवरी ...
खेळ खेळे .. मातीवरी ।
कसे हे .. अद्भुत सारे ..
नसे भास हे .. असे खरे..खरे ।
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme