मनोवळण ..।
🌾 मनोवळण...
1992..93.. श्रावण मास.. मी बस स्टाँपवर.. पावसाची भुरभुर.. वाहनांची घरघर..
माझ्या अगदी जवळ.. एक उंचच उंच.. धिप्पाड.. भडक मेकअप... चमचमती.. साडीधारी पुरुष.. टाळ्या वाजवत.. डोळे वटारत.. बिभत्स अंगविक्षेप करत.. उभा /उभी..
मी चटकन एक नोट दिली.
रोजच तो/ती पैसे मागत असे.. मी देत असे...
मी एकदा धीर करून.. नोट व एक पत्र त्याला / तिला.. दिले...पत्र पुढील प्रमाणे...
" नमस्कार !!!
नीट वाचा व विचार करा..
आपण शरीर रचनेत बदल करु शकत नाही. पण मनाला वळण लावू शकतो ना ? विक्रुतीचे भांडवल न करता.. त्यावर उपजिविका न करता.. दहशत निर्माण न करता..
कलेत.. सेवेत.. मनाला गुंतवून.. पैसा व विश्वास मिळवता येतो का बघा.."
8.10 दिवसांनी तो/ती परत भेटली.
मी दिलेले पत्र हातात...
व आंसू नयनात !!!
नाही.. बिभत्स हावभाव..
नाही.. कर्कश.. टाळ्या..
म्हणाला..
"काम कोण देणार?शिक्षण पण नाय !"
एक कुत्रे त्याच्या बरोबर सतत असे.
मी तोच धागा पकडत म्हणाले..
कुत्री संभाळ.. लोकांना प्रश्न असतात कुत्रे कुठे ठेवावे..
तो आनंदला..
त्याला मी त्या काळातील दर.. व इतर माहिती दिली.
आता.. त्याचे अद्ययावत ..
Dog caring Centre आहे.. ज्या माणसांनी त्याला झिडकारले.. त्यांची च कुत्री तो..
शीळ घालत.. गाणी गुणगुणत.. प्रेमाने संभाळतो.. हाता खाली.. तीन नोकर आहेत..
चार पैसे राखून आहे..
दर श्रावणात फोन आवर्जून येतो..
भरभरून बोलतो..
अश्रू ढाळतो..
सद्भावनेचे.. क्रुतज्ञतेचे..
आनंदाचे...
(काल त्याचा फोन आला व सरसर सरी ओघळल्या..)
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments
Post a Comment