वय लहान.. क्रुती महान ..

वय लहान.. क्रुती महान..
यंत्र युगात गुरुग्रुही न जाता सुद्धा 8 ते 12वयाची बालके शाळा.. अभ्यास सांभाळून चार डगरींवर पाय रोवून तोल न ढळता..अनेक क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी करतात.
*** नारळाचे चित्र अवघ्या अकरा वर्षीय श्रेयाने रेखाटले आहे. विश्वास नाही ना बसत ? खरा नारळ फोडून त्याचा फोटो काढला असे वाटते ना?तसेच तिने भिंतीवर केलेले painting..
पक्षांचे बारकावे बारकाईने तिच्या कुंचल्यातून उमटले..  तसेच तिने बनवलेला गणपती कौतुक करावे तितके कमीच !!!

*** तसेच.. प्रत्यूष.. अवघ्या 10व्या वयापासून मऊ मुलायम पोळ्या करतो.. बेक्ड पँटीस लीलया करतो.
बँड व बुद्धीबळ यात त्याला पेलवत नव्हती इतक्या मोठ्या शिल्ड मिळवल्या.. कला सादर करताना ची तद्रुपता.. वाखाणण्याजोगी.!!!

*** तेज.. वयाच्या ८व्या वर्षी पासून नाटकाचे script लेखन करणे, वक्त्रुत्वात .. एकांकिकेत लक्षवेधी भुमिका करणे.. आशयपूर्ण  कथा लिहीणे.. वादविवाद.. परिसंवाद.. अव्वल.. सारेच नवल..

***यश .. अवघा 5-6वयाचा.. पण पाण्यात उतरला.. की जणू.. मासोळी..
स्टेजवरचा एकेक अविष्कार बघून मन गहिवरते..

*** कंची.. 6-7 वर्षीय चिमुकली..
सहज..विचारते..
" आत्या भूप गाऊ की यमन?
अऩ् मम मन.. त्या दिव्य सरीत चिंब होते. लुकलुकत्या नजरेत विरघळते.

*** उर्वी.. वय4-5.. सहज चुणीदार उकडीचे मोदक बनवते..
चिमुकला गणेश साकारते अन् तालासुरात ज्ञानीयाची ओवी आळवते तेंव्हा मी धन्य धन्य होते.
भवतालची इवली पाखरे.. विस्तारीत आकाशात.. कलात्मक रंग भरतात.. भरारी घेतात..
चिमण्या हातांची चलाखी.. आनंदी चर्या..  आत्मविश्वास , बघत रहावा..स्वतःहरवून जातात व ज्येष्ठांना खूप काही शिकवतात.. मंत्रमुग्ध करतात.
सध्याचे पालक खूपच जागृत आहेत.
बालकांची जीवन रेषा न् रेषा ते ठळक करतात.. विकसित करतात.
बाल्याची पाकळी न् पाकळी फुलवतात...

***पण..  अम्रुत सुद्धा घोट घोट घ्यावे.. गटागट प्राशन करु नये.
बाल्य पोक्त झाले, ऐन तारुण्यात वार्धक्य येते . हे लक्षात ठेवून... जरा दमादमाने.. धीराने..
आज.. आमच्या जीवनाची उतरण चालू असता बालकांची ही कलात्मक चढती  इंद्र थनुषी कमान बघणे ..
बाल श्रावण धारा बघणे याहून दुसरे सुख ते काय हो ?
उन्नती गाडगीळ 💐

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme