रद्दीत.....

रद्दीत...
काल सायंकाळी मंद जाई गंधात न्हात.. झोपाळ्यावर झुलत.. मी डाळिंब्या ( वाल)सोलत होते.
फोन निनादला..

''मँडम, मी तुमचा विद्यार्थी... ओंकार..
मी आज पाच पुष्पहार घेतले.. त्याला गुंडाळलेल्या कागदावर तुमचे नाव दिसताच, आनंदाने कथा वाचून काढली. पण.. पण..

मँडम, तुम्ही आमच्या आवडत्या शिक्षीका.. तुमचे शब्द.. उच्चार.. व्यक्तिमत्त्व.. विशेषतः मला दिलेला.. stage boldness.. सारे सारे डोळ्यासमोर आले.. अन् त्या तुमची बक्षिस पात्र कथा आज रद्दी त मिळाली, म्हणून अश्रू अनावर झाले अन् फोन केला.. sorry..

मी ऐकतच राहिले... त्याला म्हणाले ,
"ओंकार , अरे असे होतच असतं.. जतन करणे ही संस्कृती  हे खरंच..
पण.. परिस्थितीनुसार मनस्थिती बदलावी लागते.... आपण सारेच आज वर्तमान पत्र वाचण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो, अन् वाचून उद्या ते रद्दीत टाकतो...
कालाय तस्मै नम:।
कागद.. क्षणभंगुर आहे. जीव तोडून आम्ही आमचे काम केले.. ते तुमच्या मनाला भावले हे महत्त्वाचे !!"
आज आपण आपले लेखन.. संगणकात जतन करु शकतो..
जतन संस्कृतीचे द्योतक होय !!!
नवतंत्र युगात..  ' काल ' जपला जातो.. 'आज '
प्रगत होतो.. अन् 'उद्या '
सम्रुद्ध होतो..
हे आशादायी चित्र.. सर्वत्र दिसते.. मनाला भावते..
आपसूकच .. जतन संस्कार.. घडतात..
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme