आकाश शाळेत...
काल दुपारी ' आकाश शाळेत ' पांढरे ढग पुंजके अस्ताव्यस्त पसरलेले । अचानक कृष्ण मेघांची हुल्लड उठली ! पवन चक्राने घरघर केली ! दुष्काळ ग्रस्त भागाची पाहणी झाली! वा-याच्या हेलिकॉप्टर मधून कृष्ण मंडले आली ! बराच वेळ खलबते झाली ! धवल जलदांची हकालपट्टी झाली ! तप्त रविराजाची खरडपट्टी काढली ! संतप्त वीज कडाडली ! धरा थरथरली ! काळी निळी पडली !
सावळ्या घनाची मस्ती वाढली ! गरमागरम वाफांची मेजवानी रंगली ! काळ्या मेघांची पोटे टम्म फुगली ! खेचाखेची , ढकलाढकली ! वीज कडाडली ... फुटली ! धरेवर वर्षा कोसळली ! नाज़ुक झाडे उन्मळली ! आकाश शाळेतील शिस्तबद्ध मुले सैराट झाली !सायंकाळी सूर्य गुरुनी सर्वाना शांतवले,
" अवेळी अकाली सैराट होणे योग्य नाहीं ! संयम पाळणे , वेळ पाळणे महत्वपूर्ण! ! वृत्ति सैराट , होतो नायनाट !"
या वर्षी निसर्गाने ठरवले आहे ... सैराट न होण्याचे ! मानवाने पण सैराट वृत्ति चा त्याग केला , तर निसर्ग वाचेल ! मानव वाचेल !!! संयम संस्कार अंगिकारुया !
निसर्ग वाचवुया !!!
उन्नती गाडगीळ 🙏

Comments
Post a Comment