चित्रावरुन.. शब्दांकन..

चित्रावरुन.. शब्दांकन....सुनसान रस्ता.. दुतर्फा.. गर्द हिरवी गार झाडी.. कातर वेळ.. चिटपाखरूही नाही..
बेफाम.. बेछूट वाहणारी .. वाहने..झोंबरे वारे.. रिमझिम.. धारा.. मधून.. मधून .. छेडणाऱ्या..
काळोख पसरत चाललेला..
अश्या वेळी.. तरुणींनो जरा जपून हं...
वन्य पशू.. नरपशू... चोर.. कोणता शिकारी.. कधी डाव साधेल.. डल्ला मारेल.. सांगता येत नाही..
स्वातंत्र्य.. मिळाले.. तरी पावित्र्य राखणे.. महत्त्वाचे.
..... Boldness जरुर असावा.. संरक्षण.. शिक्षण जरुर घ्यावे.. पण विनाकारण विषाची परिक्षा घेऊ नये.
अन् चर्चेचा विषय होऊ नये.
शक्यतो.. रात्री.. अपरात्री .. सुनसान क्षेत्रात फिरु नये.
तरुण मुलीच काय, आजकाल ..
युवकांनी सुद्धा.. जपून रहावे.
जपून रहाणे , म्हणजे भ्याड पणा नव्हे..
उद्याचे माता.. पिता.. आपण बनणार.. तर तन.. मन.. शुद्ध.. पवित्र राखायचा.. या गणेशोत्सवात.. संयम राखण्याचा संकल्प करुया..
आजच्या तरुणी..उद्याच्या माता गौराई..
तरी.. सुशिक्षित पणे सुरक्षित रहाण्यासाठी.. कोण संत.. कोण दैत्य याची पारख करून ,स्त्री गर्भ रक्षुया..
पवित्र... मंगल ठेऊया..
अन् शौर्य...धैर्य.. स्थैर्य.. गौरी जवळ मागुया..
उन्नती गाडगीळ .💐

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme