रेड क्राँस दिन...आपणही एक पाचोळा बनणार....
🐤सतत..चार दिवस नुसतच धुळीचं वादळ होतयं..मळभ भरून येतयं..तन..मन घुसमटतयं.. साचतयं..ठसठसतयं..पण..औघळत नाहीये..
पाचोळा उडतोयं.. गरगर फिरतोयं.. विसाया शोधतोयं.. असचं चाललं होतं !!
आज मात्र स्वच्छ सूर्य प्रकाशला.. दिन तेजाळला.. अन् .. पाचोळा.. धरेवर विसावला.. लगेचच किडे, मुंग्या, आळ्या, गांडूळ, डास,चिलटे..इ. बारीक सारीक जीवाणूंनी त्या पाचोळ्याचे पांघरूण केले.. त्याच्या छत्रीखाली.. तडफडते जीव विसावले..
... उद्या त्या पाचोळ्याचे नामकरण .. कचरा.. होणार.. अन् तो जाळला जाणार.. तरी सुद्धा तो खत रूपाने.. सोने बनणार !!!
आपणपण एक दिवस .. पाचोळा.. बनणार आहोत. आपला 5ते6 फुट देह नुसताच जाळून टाकायचा की .. नेत्रदान.. अवयव दान.. देहदान.. काही करुन उजळायचा.. ते ठरवावे. अन् उजळायचे.. असे जर मनात असेल तर आज जागतिक रेड क्राँस दिन चा मुहूर्त साधून फाँर्म भरून टाकू.. अन् इतरांना ही सांगुया.. चला.. तर ..
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment