प्राजक्त... शेफाली..🙅
🙏 प्राजक्त ... देवाजीच देण ... 🙏
जांभुळलेली गाभुळलेली पहाट व हरीत पानाने डवरलेला , बहरलेला दुरंगी प्राजक्त .... एक गहीर गोजिर नातं । श्रावण धारात मनसोक्त नहातो अन् नि: शब्द तेने , नम्रतेने भूमि वर हासर्या ,नाचर्या चांदण्यांचा वर्षाव करतो ... जणू मानवंदना देतो ! पारिजात ..भक्ति प्रीति विरक्ति चा तिरंगी गोफ । वेचावा लागतो खुडता येत नाहीं ! फुले ओवताना दोर्याला रंगीत व मनाला गंधीत करतात । दिव्य वृक्ष। मानवाला माळता येत नाहीं । ओंजळीत भरुन श्वासा..... श्वासात माळावा ! मनभावन पारिजात शेफाली नावाने ओळखला जातो । प्रत्युष समयी शेफाली फुलांचे शिंपण अनुभवणे म्हणजे स्वर्ग सुख! तन शहारते...मन मोहरते अन् गुणगुणते .... टप टप पडती अंगावरती प्राजक्ताचि फुले....
.🙏 उन्नती गाडगीळ 🙏

Comments
Post a Comment