सुंदर छोटे तळे...

सुंदर छोटे तळे ..
काठी .. गर्द झाड हिरवे ...
पाण्यात वाकुन पाहे ...
आपुले रुपडे गोजिरे  ।
मुग्ध होऊन रुपावर ...
डोलत होते तालात ...
सळसळ सळसळ पानातुनी ..
हासत होते गालात ।
गालावर लाली फुलली ...
मुग्ध कळी रुपात ।
वा-यानी शीळ घालता ...
फुल फुलते झोकात  ।
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme