वर्षालंकार...🙅
तू श्रावणत नाचता ...
पाऊस 'मेखला ' बनतो ।
गौर कमनीय कटीवर ...
रुणझुणतो ।
तू गिरकी घेता ...
पाऊस ' पास्स ' बनतो !
रेशमी कुंतलात ...
चमचमतो ।
तू मुरका मारता ...
श्रावण रत्न माला बनतो ...
डौलदार घटांवर ...
घरंगळतो ।
तू मुद्रा भिनय करता ...
श्रावण .. भरजरी शेला बनतो ...
रसरसत्या वेली वर ...
विळखा घालतो ।
तू ... श्रावणात .. थिरकता ...
पाऊस पैंजण बनतो ...
मेंदी रंगल्या पाऊलांवर ...
लखलखतो ।
उन्नती गाडगीळ 🙏
पाऊस 'मेखला ' बनतो ।
गौर कमनीय कटीवर ...
रुणझुणतो ।
तू गिरकी घेता ...
पाऊस ' पास्स ' बनतो !
रेशमी कुंतलात ...
चमचमतो ।
तू मुरका मारता ...
श्रावण रत्न माला बनतो ...
डौलदार घटांवर ...
घरंगळतो ।
तू मुद्रा भिनय करता ...
श्रावण .. भरजरी शेला बनतो ...
रसरसत्या वेली वर ...
विळखा घालतो ।
तू ... श्रावणात .. थिरकता ...
पाऊस पैंजण बनतो ...
मेंदी रंगल्या पाऊलांवर ...
लखलखतो ।
उन्नती गाडगीळ 🙏
Comments
Post a Comment