श्रावण.... नेम.. व्रते...

🎍श्रावण.. नेम..व्रते...
माझ्या बालपणी..पाहिल्या.. सभोवताली.. बऱ्याच बालविधवा..केशवपन केलेल्या, एकवस्त्रात.. अलवणात स्वतःला गुंडाळून.. देवापाशी नाही तर चुलीपाशी.. या दोन च जागी त्या अंगाची जुडी करुन.. (जणू त्या जुडीत सारे क्लेश गुंडाळून) त्या बसायच्या... कडाक्याची थंडी असो.. वारा.. धारा.. मारा असो.. कधीच त्यांच्या पाठीवर मऊ मुलायम शाल वा डोक्यावर छत्री मी पाहिली नाही..
अंतरातील.. उमाळे.. दु:ख ,कढ.. त्या श्रावण सख्यास सांगायच्या..
नरपशू पासून बचाव व्हावा.. स्वमन शांत रहावे.... इ. अनेक कारणे.. त्या..
कडक नेम, व्रत.. वैकल्ये करायच्या...
उदा..
अनवाणी रहाणे, एकभुक्त(नक्त)रहाणे.
काकडारती...
सहस वाती वळणे...
50 हून जास्त ठिपक्यांची रांगोळी काढणे..
अखंड वाचन..(चढ.. उतार )
अखंड जप.. अघोरे उपवास
एक वाढप..
वगैरे व्रते त्या करत.
माझी आजी व माझ्या माई (मानलेले पण जीवाभावाचे नाते ) दोघीही.. विधवा.. पण सकेशा.. सुशिक्षित.. तरीही मनात अत्यंत दु:खी.. कष्टी..
त्या दोघी ही.. काही अघोरी व्रते करत असत.
त्या दोघींनी अत्यंत त्रास साहिला..
 त्यख दोघी.. माझे दैवत.!!!
अन् त्यांनी साहिलेल्या क्लेशांची जाणीव म्हणून..
मी ही ..
* एक श्रावण.. एकभुक्त व्रत..
*एक श्रावण.. 30..03 गोपद्म रांगोळी व्रत..
* एक श्रावण.. रात्री 12ला स्नान करून ओलेत्याने.. श्री. व्यंकटेश स्तोत्र  वाचन .. 108 वेळा..
वगैरे केले.. करून अनुभवले.. की ..
पूर्वी च्या स्त्रीच्या मानाने आपण खूपच सुखात आहोत..
सद्यस्थितीत... अघोरी व्रते न करता.. सभोवतालचे निरीक्षण करून.. जाणीवांना धार करण्याचे व्रत अंगिकारुया.. अन्यायाविरुद्ध.. आवाज उठवत्यासाठी.. मन समर्थ.. करुया..
उन्नती गाडगीळ🌹🙏श

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme