साळला चाललं...

साळला चाललं...
सायबाचं पोरं..साळला चाललं..साळला चाललं.. साळला चाललं रं..
हातभर पेंट.. वीतभर..शर्ट...
हातभर पेंट.. अन् वीतभर शर्ट ..
अन् बोटभर ..टाय...
साळला घाललं.. रं.. साळला चाललं ।।
शिंग फुंकलं... पम् .. पम्... पम..।

पाठीवरचं पोतडं..साळला चाललं..
वीस.. तीस.. बुकं.. अन् पन्नास चोपड्या...
साळलां.. चाललं..रं..साळलां.. चाललं...
शिंग फुंकलं.. पम्.. पम्.. पम्...

एक बक्ष्या.. अन् पन्नास लेखण्या...
आया.. बाया.. साळकाया..माळकाया..
साळलां.. चाललं.. रं.. साळला चाललं..

मिसळ.. वाणी.. न् .. भेसळ पाणी..
Jack &Jill.. न्.. Happy गाणी...
खाउच्या डब्ब्यात् .. झोपली .. मँगी..
अन्.. खीशातली.. फणी बी..
साळला .. चालली.. रं.. साळला चालली..

टक्..टक् .. बूट.. साळला चाललं..
टक् टक् बूट.. बुटाचे बंद.. अन् लेसीचं फूलं बी...
साळला.. चाललं.. रं.. साळला.. चाललं...

इवलसं कार्ट.. अन् खंडीभर सामान...साळला.. चाललं.. ऱं.. साळला चाललं...

टाssटा.. बाssय.. करत साळला चाललं..
पेंगत..हेंदकाळतं.. साळलां चाललं...
बशीत .. बसून.. साळला .. चाललं..
साळला.. चाललं.. साळला .. चाललं.. रं...
उन्नती गाडगीळ💐

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme