भंग.. अभंग..

🍁 भंग... अभंग..
श्रावणात माझी आजी गुलबर्ग्याहून.. पुण्यात यायची.. खास.. भजन,वाचन, किर्तन.. आस्वादायला...
मी एकदा तिचे बरोबर गेले होते भजनाला.. टाळ वाजत होते.. पण माझे मन मात्र शाळेत.. सुरु असलेल्या नाट्य वाचन सरावात होते..
अन्.. नवीन शिकत असलेल्या लेझीम च्या..
छुन्..छूशन् .. छननन्.. छन.. एक.. दो..तीन्.. तीन् चार.. छन्.. या नादात होते. भजन.. राहून गेले..

शिक्षण.. संसार.. साऱ्या षड्रसात आकंठ बुडले..
जीवन वाटेत.. कधी काटे.. तर कथी फाटे.. कधी चटके.. फटके.. चुटके.. तर कधी.. कथी गोड गोड घुटके.. घेण्यात.. भजन मागेच पडले..
आता मात्र गेली अकरा वर्षे भजन शिकत आहे.. तीनशेहून जास्त भजने वहीत आहेत..
पण.. अंतरंगात.. उतरली किती हा प्रश्न च आहे..

अभंग.. ज्या छंदात भंग नाही तो अभंग !तुकोबांनी वेदच जणू लोकरुपात मांडले अन् भक्ती च्या वाटा उजळल्या..
ज्ञानेश्वर माऊलींच्या अनुभूति चा मोगरा दरवळला.. नामदेवांचे आर्त.. फेसाळले..नाथांची समचित्ताची शांती तेवत आहे.. समर्थांच्या प्रव्रुत्ती प्रबोधनाची तत्वे तेजाळतात व मनोदीप लावतात.
Life is a gap between birth & death !!!
अन् ती गँप भरून काढण्यासाठी.. काही श्रवण.. मनन.. वाचन.. लेखन.. करावे यासाठी श्रावणाहून शुभ मुहूर्त कोणता हो?
निसर्ग सुद्धा.. शूचिर्भूत होऊन सज्ज असतो..
सुश्रवण करायला..
तप्त सूर्य शांत.. पणे सुदर्शन घेतो..
हरित पाती.. टाळ वाजवतात..
सागर.. नारळ..दीप लेऊन.. पवित्र.. पितांबर नेसून श्रवण.. गजर.. नर्तन करायला तयार..
अन् मग.. मानवी मन सुद्धा नकळत थिरकते.. पावले ताल धरतात..
अन् तल्लीन होते.. गाऊ लागते.. अभंग..
एकतारी संगे एकरुप झालो...
आम्ही श्रावणाच्या रंगात न्हालो...
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme