एक साठवण...
🌷 एक साठवणं 🌷
माझी आई ३६ वर्षीय होती. जुन्या सर्व मैत्रीणीनी एक दिवस कब्बडी खेळायचे ठरवले ....
दातार वाडा... अंगण लिंपले ... फक्की आखून क्षेत्र तयार केले ... ३५ 'ते ३७ वयोगटातील ललना ... 3...4 मुलांच्या माता ... नऊवारी नेसून ... पदर खोचून ... अंबाडे बांधून ... बांगड्या सरसावत... मंगळसूत्र मिरवत ... झोकात या रणरागिणी मैदानी उतरल्या ...
दोन गट तयार झाले. शिट्टीच्या तालावर ... श्वासाच्या लयीवर ... हुsssतूsssतू .. जपत ... मोठ्या त्वेषाने ... चुरशीने ... चपळाईने ... वीजेच्या उत्साहाने ... झडप घालणे... तंगडे खेचणे ...बाद करणे... चालू होते . ! जल्लोष ... टाळ्या ... हश्या ... बक्अप् ! Cheers! अरे वा ! शाब्बास ! आरोळ्यांनी मैदान दुमदुमले !
चंद्र सुद्धा झाडाआडून हासत होता ! गोठ्यातील गाय आनंदुन बघत होती!
माझी आई तिच्या शालेय जीवनात कबड्डी कप्तान होती ! तिला काही दु;खातून बाहेर काढण्यासाठी , माझ्या आजी ने ... लेकीच्या मैत्रीणीना जमवून हा सामना आयोजित केला ! आजी चे लेकीचे मन सावरऩे व आईचा अमाप उत्साह!!! दोन्ही मनावर कोरले गेले !!!
उन्नती गाडगीळ 🙏

छान आहे नेहमी प्रमाणे
ReplyDeleteवाह
ReplyDelete