मात्रु.स्पर्श...
मात्रुस्पर्श...
आज मात्रु दिन.. आईच्या साऱ्या आठवणी.. मनात फेर धरून नाचू लागल्या. अन् नकळत श्रावण सरी ओघळू लागल्या..
सोबत.. फोटोत.. माझ्या आईने.. 1981त.. माझ्या सात वर्षाच्या.. व तीन वर्षाच्या मुलींसाठी.. मोठ्या प्रेमाने वीणलेल्या झुली .. केप्स..
बघा.. अजून किती ताज्या तवान्या दिसताहेत.
तिने स्वत:तुळशीबागेत जाऊन.. सम्राट च्या दुकानातून.. तीन प्लाय.. दोन प्लाय हवी.. ओसवाल ची..लोकर... Baby wool च हवी.. माझ्या नातींना टोचायला नको..
फुले.. तुसे .. धरणारी लोकर नकोच.
धागे तुटणारी.. गाठी बसणारी लोकर नाही ना.. सारे शहानिशा करून..
गोंड्यांसाठी पुठ्ठा.. दाभणसुई.. 10नंबर..12नंबर सुया.. सारी खरेदी करून.. लोकर देवापुढे ठेवून..
चांगला दिवस बघून वीणकाम सुरू झाले.
ती स्वत: बुद्धी बळ व कँरम पटू होती.
बुद्धीबळ डाव रंगात आला होता, पण वीणकाम पण तिला नजरेसमोर दिसू लागले..
मी विचारले..
"आई, मी वीणू का केप थोडी?"
तर जोरजोरात मान हलवून...
"नको ग, एकहाती वीण हवी..
तरच कपडा सुबक दिसतो व टिकतो.
तिचा प्रत्येक शब्द.. वेचावा.. व ह्रदयात माळावा,असा असे.
10-12दिवसात दोन केप्स वीणून , आम्ही गावाला जाताना..
दोघी नातींना कुंकू लावून, साखर चिमुट भरवून , हातात दिल्या..
मुली अगदी हरखून गेल्या.
खूप.. 3-4 वर्षे मुलींनी वापरली..
मिरवली.. पण.. अजुनही वीण सैल पडली नाही.. की टाका तुटला नाही..
कारण.. अतूट मायेचा बंध...
उन्नती गाडगीळ💐

Comments
Post a Comment