डोहाळे..।

माझी सून .. पल्लवी ...तिच्या मागणीनुसार ...
🌷🌷🌷 डोहाळे 🌷🌷🌷
या ग सयांनो , या ग सख्यांनो ,
सा-याजणी sss या।धृ ।।
नव आशेला फुटली पालवी ...
किती  किती गाऊ मातेची थोरवी ...
लाज-या वेलीला सजवाया sss या ...
या ग सयांनो ..........
गर्भ रेशमी शालू नेसवा ...
सोन्या मोत्यानी ... सखी मढवा ...
पंचारतींनी औक्षण कराssss या..
या ग सयांनो ... .... ..।।
आम्रवृक्षा  या बांधा .. हो.. झुला ..
त्यात झुलवा ... राजस बाला ...
फळा फुलानी सजवा .. तिला ...
ओsss टी .. भरा ... या...
या ग सयांनो ..... .... ।।
पंचपक्वान्नानी भरले ताट ...
षड् रसांची वेगळी वाट ...
रांगोळ्यांच्या संगे ...
रसना फुलवाssss या...
या ग सयांनो sss ।।।
आनंदे वाहे धुंद हा वारा ...
नाचत येती सुखद धारा ...
सृष्टि च्या रंगात ... रंगवायाsss या ...
या ग सया्ंनो ... या ग सख्यांनो ...
सा-या जणी या , सा-याजणी ... या ।।
आशीष द्यावया ... या ...
कौतुक कराया... या ...
या ग सख्यानो ..... ।।
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme