श्री क्रुष्णाने.. समतेचे बीज..

स्वातंत्र्याचे.. समतेचे बीज श्री क्रुष्णाने पेरले..
गोपींसह..कला..क्रीडा.. सण..उत्सव साजरे करुन समतेचा संदेश दिला.
त्याला अनुसरून देशभक्तांनी.. तन..मन.. धन..वेचून.. स्वातंत्र्याची माळ भारत भू ला अर्पण केली.
आता आपण प्रगत तंत्रज्ञानाने स्वतंत्राने भौतिक सुखाच्या झुल्यावर झुलत आहोत.
पण.. फक्त सरकारकडून अपेक्षा न करता.. स्वच्छता.. नियमितता.. स्वावलंबन.. अंगीकारुन..काही ध्येय बाळगुया..
उदा.  ... भाषा. .. काही भाषा नष्ट होत आहेत.त्यांना पुनर्जीवित करणे जरुरी.
आरोग्य... स्वतः सह अनेकांचे आरोग्य संवर्धन करणे
कुटुंब संस्था... सबंध जगात भारतीय कुटुंब संस्था आदर्श समजली जाते. पण दुर्दैवाने सध्या त्याला तडा जात आहे..
तरी संस्कार.. वर्तन नियमावली पाळणे
अर्थ स्वातंत्र्य... अर्थिक बाबतीत.. विचाराने.. विवेकाने पाऊले उचलणे जरुरी..
अनाठायी खर्च करणे म्हणजे देशाचेच नुकसान होय.
कुपोषण.. असाध्य रोग.. मनोविकार..
हे वाढते प्रमाण लक्षात घेऊन वर्तन तंत्र आमलात आणणे.
मुख्य म्हणजे आत्मविश्वासाने.. प्रयत्नाने.. स्वप्रगती करून देशाची उन्नती करुया..
अपेक्षा न ठेवता क्रुती करून स्वातंत्र्य राखुया.
तिरंगा डौलानेफडकवुया.
लक्ष लक्ष शुभेच्छा...
उन्नती गाडगीळ 💐

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme