काजळलेला चंद्र...

#काजळलेला चंद्र...
काल सर्वत्र उत्साह सळसळलेला असताना.. प्रभा मात्र उदास..निष्प्रभ दिसत होती..विचारताच पुटपुटली...
" अग , माझा भाऊ.. अगदीच आळशी.. निरुत्साही..
दरवर्षी मी त्याला राखीला .. बोलावते.. आमचेकडे राखी.. खूपच धमाल. .. खूप माणसे.. मजाच मजा.. तर सर्वांसमोर माझा भाऊ मला ऐकवतो..
"हँ... हे कसले फँड.. राखी बांधून घेणे.. फोटो काढणे.. फालतू सारे.. फालतू वेळ खर्च करणे.. मला आवडत नाही.. मी खूप busy असतो.."
त्याची पत्नी पण री.. ओढते..
अगदी लहानपणापासूनच त्याला.. घरात सण.. असले की त्याची तणतण.. धुसफूस.. चिडचिड.. अंगझाडून.. रसरसून काम करणे याची आवड नाही.. उत्साह नाही.. हे कशाला.. ते का.. ह्यात काय अर्थ.. ही भाषा..
समारंभ.. म्हणजे.. सर्वांशी सम साधणे.. नात्याचा गोफ वीणणे .. त्याला समजत नाही .."
म्हणजे.. तो.. पौर्णिमेचा ग्रहण लागलेला.. काजळलेला.. चंद्रच की!!!
खरचं... चंद्र व प्रुथ्वी बहिण.. भाऊ...
प्रुथ्वी.. सातत्य, आगत्य, धैर्य, सहनशीलता.. याची मुर्ती...
तर.. चंद्र.. खुशालचेंडु..
सातत्य, आगत्य, धैर्य.. सहनशीलता सर्वाचाच अभाव.. स्वमग्न.. मजेत हासत.. चांण्यांना निरखत..बसणार.. ते सुद्धा नियमितता नाही..
मग... कधी तरी.. चंद्राच्या आळशी.. विलासी.. चैनी.. लहरी.. व्रुत्ती ला.. प्रुथ्वी शह देते...
ऐन पौर्णिमेला.. स्वछायेने त्याला ग्रासते... त्याची मिजास उतरवते.. तो काजळतो.. पण बोध मात्र घेत नाही..
हे असेच असते..
उन्नती गाडगीळ🌹🙏का

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme