तरुणाई स सलाम..

मंगळागौरीसमोर.. काल..  I.T. तील लेकी.. सुना.. ऐटीत..
चापुन चोपून नऊवारी नेसून.. खोपा घालून.. गजरे माळून..
पदराचा पिसारा फुलवत.. चंद्र बिंदी झळकत.. नथ उडवत.. बुगडी चमचमत.. कंगन किणकिणत.. पाटल्या खणखणत.. जोडवी टकटकत.. साखळ्या.. रूणझुणत.. मेंदी खुलवत.. अंगठ्या  नचवत.. सूप उडवत.. लाटणी.. टणटणत..
भान हरपून नाचत होत्या.
जणू.. लक्ष्मी व सरस्वती मिलन!!!
खरचं.. तरूणाईचे कौतुक करावे तितके कमी!
सळसळत्या.. उसळत्या.. गोजिऱ्या.. साजिऱ्या या तरुणी.. श्रावण सरीच.!!!

रोजच्या वेगातून वेळ काढून.. दणादण फुगड्या.. सरसर..सरीसह.. झिम्मा..पिंगा.. कोंबडा.. आगोटा... पागोटा.. खुर्ची.. मिरची.. साऱ्या साऱ्या खेळांसह .. सासर.. माहेर चा सुंदर गोफ विणला..
स्व .. विसरुन द्वेष विसरून.. सर्व समावेशकता निर्माण करणे.. हा या खेळाचा उद्देश.. अन् ते मर्म आजची तरुणाई जाणते..
जुन्या परंपरांना.. नव वेष्टनात गुंडाळून.. नवतंत्र.. नवगंधाने नव्यादमाने.. उमेदीने.. नवउन्मेषाने सादर करते.. ही तरुणाई.
खरचं.. तरुणाईला सलाम !!!
हे समाज चित्र सुखद आहे.!!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme