खेळिया..

💃🏾खेळिया...
ऐश्वर्य, औदार्य, सौंदर्य, धैर्य, शौर्य...
सहजता.. सुदरता..विविधता.. सरलता.. लीनता.. भावुकता.. दानता..ज्याच्या रोमारोमात भरली आहे असा श्रावण...
रस,रंग,गंध..यांचा निर्माता..स्वच्छता.. स्वतंत्रता.. यांचा उदगाता..श्रावण..
नाही.. कडकडाट.. गडगडाट.. नाही वावटळ.. धुळवड.. नाही बिभत्सता.. अश्लीलता..नाही जीवघेणा वेग..
पण.. आवेगाने कवेत घेतो..
सर्व क्षेत्रात करतो संचार..पण नाही.. अंगार !!!
त्याच्या सूरात.. स्वरात आहे कोमल गंधार..
व्रुत्तीत आहे श्रुंगार.. अन् स्पर्शात.. जादुई अविष्कार !!!
हासत.. खेळत.. नाचत.. फुलवत.. झुलवत.. खुलवत.. संस्कृतीची.. संस्कारांची.. संयमाची..करतो रूजवात.. असा हा श्रावण.. मनभावन!!!
... .. शस्त्राविना..  पारतंत्र्याला... चलेजाव... म्हणणारा.. आणि स्व.. तंत्राला.. स्वातंत्र्याला.. झळकवणारा.. असा हा श्रावण सखा.. रंग रसिया... मनोमन पुजुया...
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme