#गर्भवतीसाठी प्रार्थना...

#गर्भवती साठी खास.. मी प्रार्थना तयार केली.. ती आज माझी सखी Augustin च्या मागणी वरुन पुनर्लेखन करत आहे..
******प्रार्थना******
रविराज तुला, नमन करीते भावे..
तेज:पूंज बाळ मज व्हावे।
अनिला, तू रे.. अवखळ.. नटखट भारी...
आरोग्याची देई शिदोरी ।
जलदेवी गे.. होऊ कशी उतराई...
संजीवन. .. मम बाळा देई।
गिरीराज, तुला साकडे घाली आई...
खंबीर व्रुत्ती अन् उंची देई ।
व्रुक्षवल्ली या.. शांत.. घनदाट...
मम बाळास दावी वाट।
हसरं चांदणं, शीतल हे चंद्राचं...
रुप गोजिरं होई बाळाचं।
निसर्ग देवासि नमन करीते भावे..
शतगुणी बाळ मज व्हावे।।
उन्नती गाडगीळ🌹🙏
माझी सखी Yasmeen..
आता आजी होणार.. ती म्हणाली.. दोन ओळी.. सूर्याला उद्देशुन दे..
तर....
O ! Eternal Sun..
Give me energy & light. ..
To.. make my children..
Healthy & Bright.
Unnati Gadgil🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme