ती..फुलवंती..1

# ती फुलवंती...
हायवेला छेदून एक चिमुकली पायवाट मंदिरापर्यंत जाते...
या मंदिराच्या दाराशी, धरतीच्या अंकावर , नील अंबराच्या मंडपाखाली..
ती.. एक पोतं पसरुन बसलेली...

पुढ्यातल्या त्या ओल्या पोत्यावर.. अनेक रंग.. गंध.. रस..फुलांची.. पानांची सुबक मांडणी.. काट्यातही हासणारे.. श्वैत, पित, शाम, लाल, केशरी गुलाब... सदाबहार बकुळ, नाजूक जाई..जुई.. टपोरा मोगरा.. पित..श्वैत शेवंती.. गेंदेदार झेंडू, झुपकेदार अँस्टर.. रंगतदार तेरडा..लाजरी तुळस.. अनंत पत्री.. हरळी.. कर्दळी..
सह.. ती फुलवंती बसलेली..

काळा..सावळा वर्ण.. चापून चोपून नेसलेले तोकडे लुगडे.. धारदार नाक.. कुरळे केस.. भाळी लाल चिरी.. गळा एकसरी.. कानात झुबे.. नाकात चमकी.. व निमुळत्या हनुवटीवर गोंदणबिंदू !!!
यामुळे जास्तच आकर्षक भासणारी.. ती फुलवंती...

एक पाय दुमडून, दुसरा उभा ठेवून, पायाच्या अंगठ्यात दोरा अडकवून..
भराभर माळा गजरे गुंफणारी... चलाखीने बोलणारी..मोगऱ्याच्या कळ्यांसम शुभ्र घमकदार दंतपंक्ती खुलवणारी..अशी ..ती.. मोहक.. वेधक.. फुलवंती...
मी तिची रोजचीच ग्राहक.. रोजच्या सहवासाने तिच्या मनाची पाकळी न् पाकळी उलगडत गेली..
क्रमशः
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme