मोहक..हरिणे..💐

🧕मोहक हरिणे..

चंचल,चपल हरिणी..हरित रानात बागडती..
सोनसळी उन्हात लचकत..मुरडत..भिरभिरती।

तपकिरी अंग,पांढरे बुट्टे,पाय काटकुळे..
तजेलदार रंग..लोभस टपोरे.. डोळे..काळे।

तोंडाचा चंबू काळ्याकुळकुळीत रंगाचा..साथ लडिवाळ कळप ..गोजिऱ्या पाडसांचा।

इवले कान टवकारूनी टकमक न्याहाळती...
खुट्ट .. होता मान रूतवुनी मातेस बिलगती।

सोबत..डौलदार, टोकदार, शिंगेधारी नर..
पाय पोटाशी घेऊनी उड्डाण.. वाऱ्यावर..
परि..धारदार नजर मादीवर।
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme