वर्तन दर्शिका..💐
🔰वर्तन दर्शिका..
आमच्या हुजूरपागेत(शाळेत) आम्हाला एक *वर्तन पत्रिका* असे.त्यात विद्यार्थिनीच्या वर्तनाची नोंद केली जाई...उदा...
*आज उशिरा आली.
* गणवेष परिपूर्ण नाही.
* वर्गात अत्यंत बडबड..वगैरे...
मी रोज फलक लेखन करत असे. भाषा विषयात रस असल्याने कधी हिंदी, कधी मराठी तर कधी इंग्रजीत स्व लेखन करत असे. त्यामुळे त्या तिन्ही विषय शिक्षिका माझ्यावर खूप खुश असत.
त्यामुळेच मला एकदा परांजपे बाईंनी..
'"आपल्या *बालिकादर्श* मासिकात दरवर्षी लेखन कर.जा.. पळ.. दोन दिवसांत मला *लेख* आणून दे!"
म्हणून मला पिटाळले. मी इ.7वीत होते. लेख म्हणजे काय?कसालिहायचा?काही समजेना.
मग आईला ,आजीला विचारले..
"लेख म्हणजे काय?'"
आजीने सांगितले..
एखादा निबंध/व्यक्ती चित्रण/स्थलचित्रण काही तरी लिही.पण आपल्या मनाने..आणि दे.
मी दोन पानी माझी आजी यावर निबंध लिहीला. व नाचत उडत परांजपे बाईंना दिला.
*खाडाखोड नको*
* अवतरण चिन्ह नाही*
*शब्दात योग्य जागा सोडली नाही*
* पाठपोट चालणार नाही*
*स्वतः च्या वयापेक्षा जड ,मोठी विधानं आहेत!*
वगैरे सांगत.. प्रत्येक वेळी एकेक कारण देत मला परत सहावेळा लिहायला लावला...
नंतर पाठीवर शाबासकी देत स्वीकारला.
आणि माझ्या वर्तन पत्रिकेत सुवाच्च अक्षरात लिहीले..
"उन्नतीने माझे समाधान होईपर्यंत.. सहावेळा दोनपाने परत, परत लिहीली. मी तिची जाणूनबुजून फक्त परीक्षा घेतली.
* चिकाटी हिच यशाची हातोटी*
असे माझ्या वर्तन पत्रिकेत लिहीले.
आणि तेव्हा पासून मी .. नुसती ढोबळ रोजनिशी फक्त न लिहीता..
तारीख, वारानुसार घडलेला प्रसंग, त्यानुरूप घडलेले वर्तन यांची नोंद करते.
वर्तन हे सापेक्ष आहे.
समोरची व्यक्ती ठक असेल तर आपला स्व-भाव करारी बनतो. सु-मनाशी मृदु वर्तन घडते.
दिनदर्शिका भिंतीवर असावी, तद्वतच एक वर्तन दर्शिका स्वतः जवळ असावी. म्हणजे ..स्व भान येते. स्व-जाण येते. आपल्या जवळ घटीत प्रसंगाच्या नोंदी असल्याने
कुणी आरोप करत नाहीत. कुणी खोटं पाडत नाहीत.
निदान समोर तरी धजावत नाहीत. आणि सतत त्या वर्तन दर्शिकेचा मागोवा घेतला की.. पुढे सुधारणा होत जाते...
अवघड प्रकल्प सहजपणे विनासायास पूर्ण होतात.
आमच्या शाळेने दिलेला हा वर्तन दर्शिकेचा संस्कार ..
म्हणजे.. एक सहज सुंदर मानसोपचार आहे. आत्मिक समाधानदायक आहे.
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment