मांडवाखाली..💐

#मांडवाखाली...
श्रद्धा ने विषय दिला..
डिसेंबरमध्ये.. एक आगळा..विवाह सोहळा अनुभवला....

अनु.. एक अंध मुलगी. चार वर्ष पूर्वी इ.12वीत होती. मला अंध मुलांना शिकवण्याचा थोडा अनुभव होता.. हे ऐकून हट्ट धरून बसली..
गाडगीळ मँडम तुम्हीच मला शिकवा..
तिने माझे घरी रोज येणे तिला परवडणारे नव्हते.व मला तिचे घरी रोज जाणे अवघड होते.
मग.. तिचा मित्र.. अभय... माध्यम बनला..
मी काढून दिलेली टिपणे,स्पष्टीकरणे, निबंध, उत्तरे..
थोडक्यात.. माझे लेखन...
त्याचे वाचन.. व अनुचे.. मनचक्षूने चिंतन.. मनन.. स्मरण.. वगैरे.
चार वर्षाच्या दोघांच्या परिश्रमाने, जिद्दीने.. अनु
B.A. झाली.

या काळात अनु आणि अभय .. मैत्रीला प्रेमरुप मिळाले..

अभयच्या घरात.. विरोध..
तरी सुद्धा..
डिसेंबरमध्ये.. अनुच्या घरी विवाहाचे आमंत्रण आम्ही स्वीकारले..
मोजकी 25माणसे. घराला मंगल तोरण बांधलेले..

अनु .. वधुरुपात गोड दिसत होती.
अभय.. शेरवानी ..फेटा घालून सज्ज..

अनु .. त्याच्या.. पोषाखाला .. स्पर्शत... हुंगत.. त्याचे हात हातात घेत.. ..म्हणत होती...

"  WOW !!! Nice!!!
अभयने नटलेल्या अनुचा मेंदीने रंगलेला हात स्वह्रदयावर ठेवून, हळूच अधरावर ठेवला...
पुटपुटला..

" Beautiful !!!"

त्यांचे मोकळे स्पर्श आश्वासक वाटत होते.

आपण किती वेळा आरश्यात बघतो..अनु???
 
अभय .. हाच अनुचा आरसा.. आसरा..सखा.. सोबती.. साथी.. प्रियकर.. पती.. गुरू..
सारे.. सारे तोच.. एकमेव बनला होता.

जे जग तिला दिसतच नव्हते.. त्याची तमा.. लाज बाळगण्याचे काही कारणच नव्हते.

अभय.. तिच्या अवखळ बटा सावरत होता..
ती प्रेमाने त्याला बिलगत होती..
तो .. एक च घास नाही..
तर अख्ख जेवण तिला भरवत होता..
तिला जपत होता..
खुलवत होता.. धीर देत होता..

नजरेने जे सांगता येत नाही, ते .. अनु स्पर्शाने सांगत होती.
बिभत्स, अश्लील, उत्च्छ्रुंखल.. काही भासत नव्हते.
उलट.. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते..

आम्ही निघताना..
अनु माझ्या गळ्यात पडली...
, " मँडम, आज मी धन्य झाले ! "
 दोघेही पाया पडले.
नकळत.. डोळे पुसत..मी माझ्या दोन्ही मुलांना जवळ घेतले..
तोंडून शब्द निघाले...

" शतायु भव अनु.. अभय .
सुख लाभो अक्षय । '"

घरी आल्यावर सुद्धा.. अनु.. अक्षय.. सतत डोळ्यासमोर..
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme