मैत्री...💐

#मैत्री...
मी F.B.वर पाच वर्षे लिहीते आहे.
मला तरी आभासी दुनिया वाटत नाही. विविध क्षेत्रातील व्यासंगी,हुशार, कर्तृत्ववान, लाघवी,मनमिळाऊ सुह्रद मला येथे मिळाले.
प्रत्येकाकडून काही तरी शिकत राहीले, वेचत राहिले.

मुख्य म्हणजे आजारपणाने आलेल्या.अपंगत्वामुळे (पेनाने लिहीणे अवघड झाल्यामुळे)लेखन प्रवाह खंडित झाला होता.
पण.. नवतंत्राने उंगलीच जाहली लेखणी..
मन आनंदले..मनातील विचार f.b. /w.a.वर उमटत गेले.. अनेकांच्या मनात टिपले गेले..मित्र जुळत गेले.
संवाद साधताना विषय मिळत गेले...
लेखन उतरत गेले..
कुणाला एकांकिका हवी,तर कुणाला गीत,कविता हवी.. लेख हवा.तर.कुणाला पदार्थ.. मी व्यस्त राहिले.. कल्पना कृतीत उतरल्या...व्यक्त होत गेले...स्नेह साधत..स्नेही सांधत राहिले.. त्यातूनच .. अनुबंध Short film.. दिर्घांक... वगैरे घाट..चढणे.. वळणे या फे.बु.च्या दर्यात घेतली.

मुख्य म्हणजे मनात साचून राहिलेले सत्य/मरगळ/अनुभव/अनुभूती/आनंद/दु:ख इ. भावभावनांचा गोफ तयार करून तो W.A./ F.B. मित्रपरिवार समोर उकलणे.मित्रांसोबत मन मोकळे करण्यासाठी
हा प्रभावी मंच आहे. त्यामुळे अंतर्मनात साचून राहिलेले दु:ख वाटले जाते. मनोविकार, न्यूनगंड, लयाला जाऊन मन आरशासम स्वच्छ होते..
आपणा सर्वाशी छान मैत्र जुळले.
धागे जुळले.मैत्रीच्या या रेशीम गाठीअतूट राहोत.
सर्व मित्रांना आरोग्य, सौख्य,संपन्न जीवन लाभो.. हीच प्रार्थना.
अन् सादर आभार.
उन्नती गाडगीळ💐

Comments

  1. छान लिहीलय,मनस्पर्शी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme