अभिमानास्पद..💐

♥अभिमानास्पद!!!
माझी लेक अमेरिकेत राहते.तेथे अर्थ, नामक मायाआहे.पण सेवेसि सदा तत्पर.. असा सेवकवर्ग मिळत नाही.हे सर्व श्रृत आहेच.

रविवारी तिच्या सखीकडे वास्तुशांती होती.30/35पान जेवणार !म्हणून माझी लेक सतत दोन दिवस मदतीला जात होती.

शनिवारी दोघींनी मिळून 3किलो पुरण शिजवून यंत्राच्या साह्याने वाटून ठेवले. दोन,भाज्या निवडून चिरून ठेवल्या.गुरुजींनी सांगितलेली सारी तयारी करणे, घरसजावट हे सर्व केले.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तीघींनी मिळून पुरणपोळी सह साग्रसंगीत स्वयंपाक 30माणसांचा केला..

मला तरी बाई कौतुक वाटले.. दोघींचे !
माझ्या लेकीला माहेरी वा सासरी कधीच इतके कष्ट उपसावे लागले नाहीत ,त्या पार्श्वभूमीवर कौतुक व अभिमान वाटतो.

माझ्या ओळखीत अनेक मुली अमेरिकेत आहेत. सर्वचजणी रीतसर पुरण..वरण करतातच असे नाही.
फक्त नैवेद्य पुरणाचा दाखवून बाकी सर्व पाहुण्यांना..थोड्या पोळ्या, सँलड ,
भाताचे प्रकार, उसळ,सँडविच, सूप,मिठाईअसे ठेवतात. हे पण मी बघीतले आहे.

आमच्या एअरपोर्ट काँलनीत आम्ही स्त्रिया एकत्र जमून असा स्वयंपाक करायचो.नाही असे नाही.

पण आज भारतात आपण किती नोकरावर अवलंबून आहोत किंवा लगेचच.. चितळे दुकानाकडे धाव घेतो.हे समजते.

आजची उच्च शिक्षीत तरुणाई ..विशेषतः स्त्री वेळ आली की .. सर्व आघाड्यांवर.. सहजपणे लढते.हम भी कुछ कम नहीं । हे दाखवून देते.कधी लाटणे हातात धरून, तर संगणकावर बटणे दाबत,धीराने ,कष्टाने समर्थ बनते.
तो क्षण..नक्कीच अभिमानास्पद!!!

उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme