कवडसा....💐
#कवडसा...
सततच्या रपरप पावसाने श्रावण रूसला होता. तेजोगोल झाकळला होता. भरदुपारी अंधार पसरला .होता.झाडे निमूट न्हात होती. वारा शांत होता.
मी झुल्यावर झुलत गुणगुणत .. एकांकिकेसाठी गीत रचना करत होते. कुंद वातावरणात शब्द सुद्धा अडून बसले होते.. कागदावर उतरत नव्हते...
अन् अचानक काळ्या कबऱ्या ढगाला ढुशी मारून ,तप्त सूर्य पुढे आला.. रागाने लाल झाला, श्रावणाचा कान धरून.. त्याला पुढे धरेवर पाठवले..क्षणार्धात सहस्त्र करांंनी.. पिवळे कोवळे तांबूस किरण.. खेळू लागले...
आणि.. गवाक्षाच्या इवल्या फटीतून .. एक चौरस,गोलसर,ओलसर,लोभस,तेजस *कवडसा* कधी माझ्या भाळी बिंदी ,कधी गालाची खळी बनून, कधी दंडाची वाकी ,कधी मनगटाचे कंगन, तर कधी उंगलीचे रिंगण बनून मला सालंकृत करत .. हासत खेळत ,रुंजी घालत राहीला.
ओहो.. त्या क्षणी मी जगातील सर्वात ऐश्वर्य संपन्न स्त्री झाले !!!
माझे मनपाखरू फडफडत बाल्यात गेले..
झरोक्यातून असे कवडसे भिंतीवर, छतावर, पडत असत ,आम्ही सर्व मुले उंच उंच उड्या मारून त्यांना पकडण्याचा खेळ खेळायचो. .. पण.. अंह..ते कधीच हाती लागले नाहीत. जणू म्हणत असावेत.. आकांक्षा उंच ठेवा.. ध्येय उच्च ठेवा..
आणि आता.. आकाशस्थ अदम्य शक्तीने.. अचानक, अनाहत ,अलगद ते सुवर्ण कण.. अलवारपणे मला बहाल केले...सूचक!!!
जणू सूचना देत आहे..
आता नको उंच आकांक्षा..
आशेमागे धावाधाव..
याला जीवन ऐसे नाव!!!
बाल्यातील प्रेरक कवडसा... आता सूचक बनून माझ्या अंगाखांद्यावर बिनधास्त खेळतो आहे. स्थितप्रज्ञ मनाला कुरवाळत आहे... भ्रांती जाऊन.. शांती कडे वाटचाल आनंदाने बघायला आला आहे,माझा बाल सवंगडी..सूर्य
किरणांच्या शलाकातून पडलेला.. God's Gift..
एक..*कवडसा* ...
मम मना देतो .. दिलासा !!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment