खासच खास... अनुराधा काकू
🌹खासच.. खास !!!🌹
माझ्या उमलत्या वयात..
भाऊकाकाचे लग्न ठरले.
ऐकत होते...
काकू.. मुंबईची आहे..
खूप खूप शिकलेली आहे.
नोकरी करणारी आहे...
Yes.. No.. बोलणारी आहे.. वगैरे..
त्यामुळे तिला बघण्याची उत्सुकता होती.. व ती कुणी असणार .. खासच खास ही धारणा होती .
अन् तद्वत.. अनुराधा काकूच्या प्रतिभेने तिची प्रसन्न प्रतिमा मम मनी सदैव खासच खास राहिली.
काकूचा भव्य मकरंद सहनिवास...
अन् साक्षात दिव्य श्री क्रुष्ण सहवास..सारेच राजस,लोभस.. खासच.. खास !!!
स्त्री वादी विचार सरणीची असून, सदैव पतीच्या तंत्रात राहणारी...
'अनुराधा ' ' अनुराधा'
मंत्रात विरघळणारी..
ही.. मधुर शर्करा.. खासच खास !!!
स्वयंसिद्धा असूनही, परदु:ख जाणून , सहकार्य करणारी.. पाय जमिनीवर असणारी ही असिधारा..
खासच खास !!!
जूने जपून, नवतीची कास धरणारी..
माय.. पित्याची सेवा करणारी..ही.. उत्तरा..
खासच..खास!!!
धावत्या धारेबरोबर स्वतःला बदलणारी..
पण मूल्ये जपणारी..
ही.. खळाळती.. निर्झरा..
खासच.. खास !!!
आणि.. आता..
सुख.. दु:ख समेक्रुत्वा..
या व्रुत्तीने.. शांतमनाने..
ताठबाण्याने.. हासत.. हासत.. जीवनाला सामोरी जाणारी.. योगेश्वराची युगंधरा.. खासच.. खास !!!
आणि अशी खास.. खास माझी काकू आहे तिचा मला अभिमान आहे..
अन् आज तिच्या उत्तरायुष्यात तिला अमाप आरोग्य, सौख्य, लाभो..
व शतायु जीवन होवो..
हीच प्रार्थना!!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment