सौभाग्य...💐

🍀 सौभाग्य ...
माझी निरक्षर आजी ऐन तारुण्यात विधवा झाली.खचून न जाता .. सकस शिक्षण घेऊन,नोकरी करुन,दोन मुलींचे पालन पोषण व लग्ने करुन दिली अन् तिच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवला ! पारितोषिके पटकावली
तिने हिमतीने भारत भर प्रवास केला .. स्वभिमानाने कर्तृत्वाने जीवनाचे सोने केले !
तिच्या ७० व्या वाढदिवसाला मी तिच्या वर लेख लिहीला .. " माझ्या आजी चे यश हे तिचे सौभाग्य होय ! "असा उल्लेख मी केला . तेव्हा काही सूर उमटले.... " विधवेला कसले सौभाग्य?"वगैरे
माझा जोरदार आक्षेप आहे . .. केवळ विवाहिता म्हणजे सौभाग्य का? अनेक स्त्रियां रंगेल , रगेल , व्यसनी,जुगारी पतीचा छळ साहतात ! तोंड दाबून बुक्क्यांचा मार साहतात ! सुखी हासतमुखी मुखवटे धारण करतात ! तरीही त्यांच्या नावामागे ' सौ ' लिहीतो ते कितपत योग्य?
केवल विवाहीत म्हणून सौ . न लिहीता प्रत्येक स्त्री ने स्वकर्तृत्वे सौभाग्य सिद्ध करावे व पतीने समर्थ साथ द्यावी  ..
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme