कांंचन कळस...💐
🙋 कांचन कळस .....
मी 'कांचन ' बंगलीत शिरले ... हिवाळी मवाळ ,मुलायम उन्हें बागेला उब देत होती. कारंजे लडिवाळपणे तुषार उडवत होते ! मखमली हिरवळ , लाजरी सोनेरी कर्दळ ! तुलसी पुढे छोटे स्वस्तिक! तेवती मिणमिणती पणती ! सर्व बघून नवल वाटले कारण सुधाकाकूंचा हात प्लास्टर मधे व दोन्ही सूना गावाला गेलेल्या ! सारे सुरळीत ?
मी आत डोकावले ... मोठा डॅा. मुलगा पोळ्या करत होता!! अन् छोटा इंजीनियर मुलगा आईचा गाऊन हातात सुईदोरा घेऊन छोटा करत होता. ! मी चाटच पडले ! दोन्ही मुलाना बालवयातच स्वावलंबी बनव ले !
८२ वयीन काकूनी निक्षून सांगितले
" सूनाना जरा enjoy करु दे ! आपण निभावुया ! त्या आल्यावर आहेच !!! "
'अभिमान ' नामक पादत्राणे त्या गृहमंदिरा बाहेर होती! आत स्वावलंबन व परिपूर्ण जीवन चंदन ! म्हणजे जणू कांचन कळस !!!
उन्नती गाडगीळ 🙏

Comments
Post a Comment