स्थान...💐

🌸स्थान..
वहाण***  पायातली वहाण रत्न जडीत असली तरीही तिची जागा मंदिराच्या पायरी वरच असते.
खरं म्हणजे वहाण .. घाण,काटेकुटे शोषते.. स्वतः झीजते.. तिने दिलेल्या सुरक्षित ते मुळेच आपण शिखर गाठू शकतो.
पण .. ती.. नम्रपणे पायरीवर बसते.श्रेय घेत नाही.

सहाण***  सहाण.. दगडाची असली तरीही तिचे स्थान.. देवाच्या पायाशी!!!
ती स्थिर.. स्थितप्रज्ञ राहून.. चंदनाला झीजवते.. त्याचा सुगंध देवाच्या माथ्यावर लिंपला जातो.

सहाण.. वहाण.. फक्त पहिला शब्द वेगळा.. पण दोघीही आपले स्थान ओळखून.. सहकार्य करावे, नम्र रहावे.. गुणग्राहक बनावे..
हे मौन साधून क्रुतीने दाखवून देतात.अचेतन असून चैतन्य निर्माण करतात.
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme