खुळखुळा..💐

♥खुळखुळा..

व्हँलेंटाईन /न्यूइयर/outing/dating.. कारणे कोणतिही असोत..स्वैराचार.. मौजमजा.. धुंदीत मस्तीत जीवन जगणे या एकाच विचाराने पछाडलेल्या तरुणी..अनेक व्यसनांच्या गर्तेत अडकत आहेत.

संतती नियमनाच्या गोळ्या सहजपणे मुली सेवन करत आहेत...

तरीही कुमारी मातांची संख्या दिसामासाने वाढतच चालली आहे.आणि.. गर्भ नष्ट करण्यात अपयश आले.. तर..नवशिशु कचराकुंडीत/मंदिरात/जलाशयात/जंगलात...अगदी सहज टाकत आहेत.

आपल्याच शरीराचा खुळखुळा करत आहेत.

***दुसरे चित्र..

विवाहित स्त्रिया अगदी सुशिक्षित हं..
घरात.. सण, पूजा, पार्टी,सहली, समारंभ... काही असेल तर .. सहजपणे मासिक धर्म लांबवण्याच्या गोळ्या घेत आहेत. कौतुकाने.. आनंदाने..

"गणपती पार पडले बाई. मधेच कडमडली नाही पाळी. गोळ्या घेतल्या होत्याच" वगैरे फुशारकी..

*तिसरा प्रसंग* .
हा तर खूपच गंभीर आहे...
सुखी जीवनाची सुरुवात च मुळी.. गैरवापराने..

" 25 वर्षाची उच्च शिक्षीत नववधु बिनधास्त ..
जरा पाच वर्षे जाऊदे.. काय घाई.. बाळासाठी अजूनही भरपूर पैसे साठवून.. मग.. चान्स घेऊ... नुसती म्हणून थांबत नाहीत.. तर नियमन करतात..

खरं म्हणजे.. मासिक धर्मचक्र हीच खरी स्त्रीत्वाची ओळख.. स्त्रीला डौल देणे.. गर्भधारणा करणे.. दर महा अशुद्ध रक्त बाहेर टाकून.. आरोग्य शुद्ध, संपन्न राखणे..
हे किती सहजकार्य .. पण आपण.. निसर्गाच्या या चक्राला पण.. आपल्या मनानुसार.. वळवतो.. वाकवतो.. तारखा लांबवतो..
आणि मग.. येणारे ताण,तणाव, आजार.. भोग.. भोगतो.
प्रत्येक गोष्टी ची वेळ ठरलेली असते.. वेग ठरलेला असतो.

सूर्य.. चंद्र.. चक्रानुसारच धरतीला चालावे लागते.कारण.. सूर्य उर्जा आपल्या अंकावरील सर्वांना मिळावी याच एका ध्येयाने  पृथ्वी फिरते..मनमानी कारभार नसतो.

आणि आपण.. क्षुल्लक चैन करण्यासाठी.. शरीर धर्म चक्र.. उलट सुलट फिरवून.. आपल्याच तनामनाचा चूरगळा.. चोळामेळा.. खुळखुळा करायचा का.. मासिक धर्म चक्र.. वेळ.. साधून.. आपले जीवन.. टाइम टेबल आखायचे..ते नक्की ठरवुया.. आरोग्यं धनसंपदा.. मंत्र जपुया..
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme