सूर्य.. गेला अस्तास...💐

सूर्य गेला अस्तास ...
वाट झालीया धूसर ...
डोळा काही दिसना ...
साजण माझा येईना ।
   जीव माझा कासावीस ...
    मनी एकच ध्यास ...
    वेळ सरता सरना ...
    साजण माझा येईना  ।
सुस्त झाली धरा ...
चंद्र एकला हासरा ...
परि मोद मना वाटेना ...
साजण माझा येईना  ।
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme