गायीचे बाळंतपण...💐
🌷 आम्ही अमदाबादला होतो, टुमदार घर.. मागे पुढे आंगण.. बाग बगिचा...
एक दिवस दुपारी ४ वाजता .. एक गाय...
अचानक मान हालवत .. बागेत घुसली . दुरंगी बोगनवेलीच्या कमानी खाली उभी राहिली ! गाभण होती ! आर्त हंबर .. चौखुरांची थरथर ... कारुण्यमय नजर ...
भारलेली... भारावलेली... चुकलेली.. घाबरलेली... अस्वस्थ ... माझ्या सासुबाईनी ओळखले... लवकरच ती माता बनणार ! मी तिला बादलीभर पाणी दिले... घरातील अन्न दिले . सासुबाई ... एक माता... होणा-या गौ मातेला धीर देत होती ! त्या तिच्या पाठीवरुन हात फिरवत होत्या ! तिला वेदना सोसवत नव्हत्या...आम्हाला बघवत नव्हत्या !
दोघींनीही जप सुरु केला ...
माझे दोन वर्षीय लेकरु पायात घोटाळत होते! आर्त हंबर ... अश्रू बघून बावर ले होते ! आजीला चिकटले होते!
अन् त्या गायीचे वासरु बाहेर यायला धडपडत होते !
सासुबाई च्या सूचने नुसार मी गायीसाठी खिचडा केला !
एकदाचा देव पावला ! तिने एका गोंडस वासराला जन्म दिला ... मी व सासुबाई बाईनी आनंदे टाळ्या वाजवल्या ! देवापुढे गुळ खोबरे ठेवले ... ते वासरु काही वेळातच टुकु टुकु बघु लागले व टुण टुण उड्या मारु लागले! माझे कोकरु पण नाचू लागले !
गाय 🐮 कृतार्थ तेने बघत होती
सासुबाईंच्या आदेशानुसार मी गयवासराची पूजा केली अौक्षण केले, अन् ११ प्रदक्षिणा घातल्या ! त्या व सर्वच आजुबाजूचे म्हणाले " तुम्ही भाग्यशाली! गायीचे बाळंतपण केले . तुम्हाला जीवनात कधीच काहीही कमी पडणार नाहीं! पुढे ती गाय रोजच येत राहिली , एक रोमांचक अनुभव! गोवत्स पूजन माझे हातून घडले !!!🙏

Comments
Post a Comment