पाडवा... साज
♥पाडवा.. साज..
पार्ल्याला दरवर्षी पहाटे ठिकठिकाणी.. बहारदार संगीत कार्यक्रम होतात.
'संचित' ग्रूप तर्फे माझ्या काही विद्यार्थ्यांना पण इच्छा होती.. कार्यक्रम लोकांसमोर सादर व्हावा..
वाहवा मिळवावी ...
पण अनुभव नाही, अन् भररस्त्यात कार्यक्रम फसला तर .. बदनामी.. मारहाण.. मानहानी.. सारेच होईल.
बंदीस्त हाँलचे भाडे परवडणारे नव्हते.
आमचे पार्ल्याला खूप मोठे घर होते. हाँल प्रशस्त होता...
मी एका पाडव्याला.. आमच्या संबंधी व दर्दी अश्या 28 लोकांना आमंत्रित केले. नवयुवकांना प्रेरणा व अर्थ सहाय्य द्यावे असे आव्हान केले.
हाँल मोकळा करून भारतीय बैठक.. तक्के, लोड.. फुलदाणी, अत्तर, गुलाब,स्वागत सनई .. सारी व्यवस्था केली.
28-30जणांची जायफळ युक्त काँफी करुन ठेवली.
पाडव्याच्या शुभ दिनी..बरोबर 6 वाजता.. तबला.. पेटी.. तंबोरा.. विराजमान झाले...
सारे प्रतिष्ठित जमले. त्यात पार्ले भूषण.. कै. यशवंत बापट होते.
त्यांना पुष्पगुच्छ देऊन, मुलांनी त्यांचे आशीर्वाद घेऊन..
भावपूर्ण गणेश वंदना झाली... भूप आळवला जात असता.. ऊठी..ऊठी गोपाळा.. स्वर निनादत असता.. बाहेर .. चिमण्यानी चिवचिवत सूरांना मानवंंदना दिली..
आर्त स्वरांनी भारावून निमंत्रण नसलेले शेजारी पाजारी सुद्धा खेचले गेले..
वाढती गर्दी.. दर्दी बघून गायकव्रुंदाला चेव चढला.
एकाहून एक भक्ती गीते.. सिनेगीतं..मागणी नुसार सुस्वर कंठातून ओघळू लागले अन् कर्णात साठवत राहिले.
मी सखीच्या मदतीने अजून काँफी केली. शेजारुन कपबश्या मागवल्या.
एक पेटी ठेवली होती. उत्सफुर्त तेने त्या पेटीत धनराशी जमली.
ते नवयुवक खूप खूप खूष झाले.. आभाराची.. उपकाराची माळ जपत राहिले..
आम्ही उभयतांनी हेच सांगितले...
" आमची जागा मोठी आहे. त्याचा उपयोग अनेक जण वेगवेगळ्या कारणे घेतात. कार्य भाग साधतात. समाधान पावतात. त्यांचे समाधान हीच पावती!!!
अजून काही नको...
असा सूंदर साज आमच्या घरात मिळाला. ठरला ...अविस्मरणीय पाडवा..
सर्वांना शुभेच्छा!!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment