माहेरपण...
🌸 माहेरपण...
सरूबाई (मोलकरीण) पाय घसरुन पडली.. चार दिवस हाँस्पिटल मध्ये होती.काल घरी येताच मी विचारले...
" काय, सरुबाई आता घरी आल्यावर बरे वाटते की नाही?"
ती हासतच म्हणाली..
ताई , खरं सांगू का वयाच्या 9 व्या वर्षांपासून हातात.. झाडू अन् घासणी घेऊन.. चार घरची भांडी.. झाडणे.. पुसणे..सुरु झाले ते अजून चालू...
माझं लगीन झाले.. चार पोरं झाली, पोरांना पोरं झाली. पण कामं चालूच..
आयुष्यात पहिल्यांदाच हाँस्पिटलात मला स्पेशल काँट.. गादी.. आयता चहा... नाष्टा.. जेवण .. एवढचं नाही तर .. गरमागरम पाण्यात टाँवेल बुडवून त्या नर्सने माझे अंग पण पुसलं बघा !!!इतकं सुखं पहिल्यांदाच मिळालं !
अगदी माझं माहेरपण झालं बघा !!!"
मी ऐकतच राहिले. मला ते पटले.
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment