घट व अन्न घटक...

🍎घट व अन्नघटक...
सुधा माँलमधून अनेक प्रकारचे मसाले, तयार लोणची,सूप्सची पाकीटे, दही, पनीर, घेऊन आली.व म्हणाली..
" घरातील घट सुदृढ रहावेत यासाठी.. रोज एकेक पाकीट फोडून.. त्यात पाणी घालून सूप बनवून देणार ".

अनेक पदव्यांची माळधारी सुधाला सांगणार तरी कोण व कसे ?

बाजारी मसाले, पावडरी,सरबते, लोणची,पनीर, दही,खरवस,वगैरे अनेक पाकीट बंद पदार्थ अँसीड्स व रंग युक्त असतात ते आतडी जाळतात.
घराघरातील घट निरोगी ठेवायचे असतील तर..
बाजारी मसाले, अन् रोज बेकरीचे पदार्थ यांना बाssय करणे जरुरी.
भाजी/टोमॅटो/फळे कुकरमध्ये उकडून, मिक्सर मधून पटकन सूप करणे ...
धनेजीरे पूड, दालचिनी पुड, गरम मसाला, काळा मसाला, जीरे खोबरे तीळ वाटण, आले लसूण मिरची वाटण, चाटमसाला, वगैरे पदार्थ घरात बनवायची सवय लावून घेऊन.. आतडी निरोगी राखुया.

रोज दही विरजणे, ताक करणे चांगले की नजरेला सुखावणारे, पण आतड्यांना हळूहळू जाळणारे दही,विकतचे पनीर चांगले याचा विचार करू या.लिंबू पिळून मस्त पनीर बनवून आरोग्य राखू शकतो.
पदार्थ शिकवणाऱ्या महिलांनी एक लक्षात ठेऊया.. पदार्थ.. साहित्य.. क्रुती त शक्यतो मसाला घरी बनवण्याची क्रुती देऊया..
नुसतेच नवरंग.. दागिने लेवून  वरवरचे सुंदर न बनता प्रत्येक घरातील प्रत्येक घटाचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी...
सुंदर वेष्टनातील .. बाजारी फंडा हा विखारी हंडा आहे हे जाणून घेऊया..
व सजगतेने  सुंदर वस्त्रे घालून.. गजलक्ष्मीचे पूजन करून फेर धरुन नाचूया..
गाऊया.. भोंडला..
ऐलोमा.. पैलोमा..
गणेश देवा..
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme