आगळी भाऊबीज...
⭐आगळी भाऊबीज...
पुण्यात.. अशी एक वस्ती.. जेथे फक्त तिरस्कारानेच बघीतले जाते.. भ्रुकुटीला आठी पडते.. नजरेत घ्रुणा असते...
त्या वस्तीत मन मारून देहाचा व्यापार चालतो.बहुतेक स्त्रिया बळजबरीने, मजबुरीने त्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या असतात.
शिव्याशापांच्या धनी झालेल्या असतात.
परिस्थितीने मनस्थिती सुद्धा निगरगट्ट झालेली असते.
***त्या स्त्रीयांच्या द्रुष्टीने ..
कामूक, लाचार पुरुष चोर बनून येतो.. अन् आल्यावर शेर बनून वार करतो.
पैसे उधळतो.. वस्तू भिरकावतो !!!
हेच एक.. रूप.. पुरुषाचे त्यांनी बघीतलेले !!!
पुरुषातील.. सह्रदयता.. कोमलता.. वत्सलता..
त्यांना ठाऊकच नाही .
पण.. पण.. भाऊबीज दिनी ..
चार.. पाच युवक ताठमानेने, राजरोसपणे..
तेथे गेले.. त्या स्त्रियांना बहिणी मानून.. ओवाळून घेतले.. पैसे उधळले नाहीत,तर तबकात ठेवले.
मिठाई, भेट वस्तू न भिरकावता.. हातात दिल्या. बंधुत्वाचे बंध जोडले.!!!
ज्या स्त्रियांना समाजाने धिक्कारले,त्यांना या युवकांनी बहिणी म्हणून स्वीकारले.
स्त्री ..पुरुषात असं सुद्धा एक पवित्र नातं असतं..
हा साक्षात्कार झाला !
त्या स्त्रीयांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले!!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment