भाषा दीप उजळो..💐

🍁भाषा दीप उजळो..
सरिता ताईनी.. दसऱ्यापासून पाटीवर इंग्रजी अल्फाबेटस् गिरवली. जिद्दीने अक्षरगंधाचे शब्द उटणे तयार केले. ते तनामनात भिनले. शब्दाना प्रबळ इच्छाशक्ती चे अभ्यंग घातले..स्वच्छ छोटीमोठी वाक्य लिहीता.. बोलता येऊ लागली..
परदेशी असलेल्या नातवाशी.. इंग्रजी भाषेतून.. पत्र मैत्री (w.a.वर) भावबंधन सुरू झाले.!!!

काल पर्यंत .. नातवाशी संपर्क ठेवता येत नाही हो..
मला मेलीला इंग्रजी चा गंध नाही.. असे म्हणणारी सरिता.. परभाषेला आपल्या अंतरात सामावत खळखळ वाहु लागली.

*** *** ***
मला वाटते की परदेशस्थित भारतीयांनी स्वत:च्या मुलांना मात्रुभाषेचे अभ्यंग घालून..
आजी आजोबांशी अभंग नाते जोडावे.
बंध द्रुढ करावे.
बहुभाषा दीप प्रत्येक अंतरात उजळत राहो !!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme