भि़ंत.. आदर्श पाठ...
💥भिंत.. आदर्श पाठ..
श्री. ज्ञानेश्वरांचे तन.. मन.. जणू कणखर अन् चल भिंती!!!
स्वतःच्या पाठीची कणखर पण वत्सल भिंत करून, इवल्या मुक्ताचे मातापिता बनून वणवण भटकंती केली..
त्याच पाठीच्या भिंतीचा कधी रसरसती चूल बनवली... अन् त्याच चुलीवर चिमण हाताने मुक्ताने मांडे रांधले !!!
रुढी, परंपरा ,यांच्या आहारी गेलेल्या समाजाने एक बहिष्कार रुपी कडवी भिंत उभारली...
तेंव्हा.. रूसून बसलेल्या ज्ञानियाला.. चिमुकल्या मुक्ताने मधुर स्वरात अम्रुत सिंचन केले...
" चिंता, क्लेश मागे सारा..
ताटी उघडा.. ज्ञानेश्वरा।"
मौलिक मुक्तके..प्रेरक बनली...मुक्ताने.. रसाळ वाणीने.. ज्ञानियाच्या अंतरातील राग,लोभ,इ. षड्रिपुंच्या भिंती तोडल्या.
सलिल मनाने ज्ञानियाने लेखणीला प्रबोधनाची धार लावून,9000 ओव्यांची तत्वज्ञान रुपी टवटवीत फुले सुबोध भाषेत सामान्य जनांच्या ओंजळीत घातली.
अंधश्रद्धा, गैरसमज, भेदभाव, आरोप, द्वेष, मत्सर इ. अज्ञानी,अहंकारी भिंती तोडून मानवतेचा दीप उजळला.
ज्ञानियाच्या पाठी .. कणखर ,मार्गदर्शक,सहाय्यक भिंत बनून ,हासत.. गात.. नाचत मुक्ताई उभी राहिली..
जणू.. रंगीत.. संगीत.. चल .. अभेद्य.. हासरी .. रसाळ भिंतच!!!
चारही भावंडांनी.. अचल भिंत सहज चालवून जगापुढे आदर्श ठेवला..
तनामनात.. जनमानसात..
भिंती घालता.. व तोडता येतात..
12व्या शतकात सुद्धा भिंती घालणे व तोडणे ही कला, हे शास्त्र अवगत असल्याने ते सुरक्षित होते.
आज.. सुविधा उपलब्ध आहेत, विद्या अवगत आहे. पण.. भिंत चल कशी राखावी ... कधी कणखर अभेद्य ठेवावी ही कला अवगत नसल्याने...
मना..मनात...
भिंतीच भिंती तयार होत आहेत.. गैरसमज, इगो ,इ. वंगणांनी त्या अभेद्य होत आहेत... भरले कान, भारलेली मने, अन् डोळस व्रुत्ती चा अभाव यांनी या भिंती.. अभेद्य होत आहेत.
द्वंद्व वाढतं आहे...
ज्ञानेश्वरी च्या रसाळ ओव्या.. रामबाण !!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment