इवली पणती...💐

इवली पणती  ( जोडाक्षर विरहीत कथा)
काल राजसचा वाढदिवस ! सारे घर आनंदले .. घरात ..बागेत .. लखलखते दिप नाचत होते , रंगीत पाने ,फुले,फुगे मिरवत होते .. रस रंग गंध उधळत होते !
छोटे लुकलुकते दिवे.. जणू नभी चे तारे !इवली पणती तेल वात लेवून निमूट बसली होती. .. मोठे दिवे डोळे वटारत , तिला खिज वत होते " आमचा थाट बघ ! नाहीं तर तू !" ती हिरमुसली !
हळू हळू नभ गाभुळले ... आसमंत अंधारले ! दिवे खूपच चमकू लागले !
सखे सोबती जमले ... राजन केक कापणार तोच ... लाईट गेले... गोंधळ!
आजीने हळूच पणती लावली ... एका पणती ने दुसरी ... तिसरी ... सातवीं ... अशी तेजोमाला तयार झाली! केकभोवती सुबक रांगो ळी सजली !
चेहरे उजळले... घरदार आनंदले ।
शुभचिंतनाचा पाऊस पडला !
पणती गाऊ लागली ...
" मी मिणमिणती पणती ...
तेजोमय शांति।"
उन्नती गाडगीळ 🙏
मोठे दिवे डोळे वटारत ... खिजवत.. चिडवत होते

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme