एक थरार...

एक... थरार...
अमदाबादला आमच्या घराभोवती घनदाट झाडी.. बहरदार बाग.. त्यामुळे जंगली प्राण्यांचा मुक्त संचार....
रोजच दुपारी मी अंगणात.. चणे..टाकत असे व गुलमोहोरावरुन फडफडत मोर ते टिपत असे.

दारात माझ्या पाच महिन्याच्या सोनुली ला घेऊन मी निरखत राही...

मिटलेल्या रत्नजडित पिसाऱ्याने माझे अंगण झाडणारा... मोरपंखी मखमली मान थुलथुलत..डोळे टकटकत.. फदक् फदक् चालणारा .. टकटक दाणे टिपणारा.. मोर...

अन् त्याच्या तालावर आपली इवली मान लुटुलुटू हालवत.. टुकुटुकू बघणारी माझी सोनुली...
... माझ्या मांडीवरचे राजस अन् अंगणातील.. लोभस मयूर विभोर मी निरखत राही...

एक दिवस माई आल्या.. एकदम भडकल्या...
" अग,उन्नती.. केवढा हा धीट्टपणा..
अग.. जंगली मोरासमोर बसू नाही..
मोहात पाडतो अन् बाळाला टोचून टोचून मारतो...अन् स्वतःच टाहो फोडतो...
अरे बापरे ! मी थरथरले!!!
क्षणार्धात दार घट्ट बंद केले...

4-5 दिवसांनी.. एकदा रात्री.. रेडिओ वर आपली आवड चालली होती..
अन् मी बाळाच्या आवडी जपतहोते.....
दुधाची वाटी घेऊन.. बाळाला मांडीवर घेतले.. तेवढ्यात एक आडदांड रानमांजर.. टूनकन् उडी मारून आली (काँट खाली लपून बसली होती)...
मी दचकले.. मी तिला हाकलताच माझ्या पतीच्या अंगावर चढली..
पुढले दोन पायांनी त्यांच्या गळ्याला घट्ट धरले.
मी पटकन खिडकी उघडली व  तिला कुंचाच्या दांड्याने फटकारले. ती खिडकीतून पळाली.
ह्या़ंच्या मात्र घशाला चांगलीच दुखापत झाली होती.

असे अनेक प्रसंग मी जेव्हा अनुभवले.. त्यावरून मला वाटते..
पूर्वी असेच अनेक अनुभव.. पूर्वजांना आले असावेत...
अन् त्यावरून म्हणी पडल्या असाव्यात...उदा.
मांजर आडवे आले की चार पावले मागे जावे.. वगैरे.
अन् आपण याला अंधश्रद्धा म्हणतो...उन्नती गाडगीळ💐

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme