प्रेरक पितरे...

🌺प्रेरक पितरे..
आज सर्व पित्री अमावस्या..माझ्या जीवनात रक्ताच्या नात्याहूनही गहीरं नातं निर्माण करणाऱ्या सर्व विश्वासक..प्रेरक पित्रांचे आज स्मरण.. व चिंतन..

तश्या अनेक व्यक्ती आहेत की ज्यांनी मला घडवलं..
पण 2-3 जणांचा उल्लेख करते...
1) माई ** नाही रक्ताचे नाते.. पण होते जीवाभावाचे नाते. सर्वतोपरी नि:स्प्रुह  मदत करणाऱ्या व सतत आमच्यावर कासवी द्रुष्टी ठेवणाऱ्या माई नामक मात्रु दीपास आज मनोनमन!!!

2) फादर*** काँन्व्हेंट स्कूल चे सर्वेसर्वा.. Rev. Fr. D.C.Kamatha.लेकीला घेऊन गेले होते, तिला
त्यांच्या शाळेत प्रवेश मिळावा या उद्देशाने...
त्यांच्याशी गप्पा मारताना..
अचानक ते म्हणाले..
" तुमची भाषा प्रवाही आहे, अन् उच्चार एकदम स्पष्ट!!! लेकीसह तुमचे पण आमच्या शाळेत स्वागत !!!
नंतर माझी सर्टिफिकेट्स बघून, रीतसर इंटरव्ह्यू घेऊन माझी नेमणूक करणारे, स्व वर्तनातून खूप काही शिकवणारे, माझ्या कुटुंबाशी एकरूप होणारे, एकेक गावेी  मी बदलत गेले, तरीही संपर्क ठेवणारे, सल्ला मसलत करणारे..
फादर.. नामक श्रद्धा दीपास आज मनोवंदन !!!

3) सीताबाई *** अनेक गावे बदलली.. अनेक मोलकरणी जोखल्या.
पण सीताबाई.. वयाने मोठ्या, विश्वासू व प्रेमळ !!!त्यांना सुद्धा आजमनोभावे कुसुमांजली !!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme