पक्षी....
इटुकले .. पिटुकले .. धिटुकले .. पक्षी ,
निळ्याशार आकाशात .. चितारती नक्षी ।
क्षणार्धात भुईवरी , क्षणार्धात .. नभा ..
गाणे गाती फांदीवरी .. उजळत प्रभा !
टोकरती .. काळी माती .. पेरताती दाणा ,
लहरती .. झोके घेती .. खुलवती राना ।
ठुमकत .. मुरकत .. वेळावती माना ..
लचकत .. थिरकत .. सुखावती मना ।
नासलेले .. फेकलेले .. चिवडती कण ..
फडफडे .. धडपडे .. थरारते ... क्षण ।
नाहीं खंत .. नाहीं खेद .. विसरती .. घाव ..
खुले रंग .. खुले संग .. स्वच्छंदी .. धाव ।
घरट्यात .. आनंदात .. विसावतो थवा ..
संयमन .. समाधान .. शिकवतो सर्वा ।
उन्नती गाडगीळ 🙏पक्षी
निळ्याशार आकाशात .. चितारती नक्षी ।
क्षणार्धात भुईवरी , क्षणार्धात .. नभा ..
गाणे गाती फांदीवरी .. उजळत प्रभा !
टोकरती .. काळी माती .. पेरताती दाणा ,
लहरती .. झोके घेती .. खुलवती राना ।
ठुमकत .. मुरकत .. वेळावती माना ..
लचकत .. थिरकत .. सुखावती मना ।
नासलेले .. फेकलेले .. चिवडती कण ..
फडफडे .. धडपडे .. थरारते ... क्षण ।
नाहीं खंत .. नाहीं खेद .. विसरती .. घाव ..
खुले रंग .. खुले संग .. स्वच्छंदी .. धाव ।
घरट्यात .. आनंदात .. विसावतो थवा ..
संयमन .. समाधान .. शिकवतो सर्वा ।
उन्नती गाडगीळ 🙏पक्षी
Comments
Post a Comment