खेळ...
☔🙏 खेळ🙏☔
मंगलमाते तुज नमन करते,
खेळ आगळा मांडते ।
फुगडी माझी फुकाची,
सर येवो मोत्यांची ।
पाट बाई पाट,निळा नाीळा पाट ,दुष्काळी ढगांची गर्दी दाट ।
सई बाईचा कोंबडा,आला दारी,
गोणीत नाही दाणा,।
बाड़ी त नाहीं पाणी।
कुकुsssच्ssकु...
झिम्मा ग पोरी झिम्मा...
फाटा नाहीं चुलीला...
पैका नाहीं गाठीला ।
भांडण भू... आकाशाचं,
मांडते तुझ्या दारात ।
नाच ग घुमा नाच !
शेतकरी रडे मनात,
पिकं जळे शिवारात ।
नाचू मी कशी ?
पिंगा ग पोरी पिंगा
दहशतवादाचा दंगा ।
एक दिलाने गोफ गुंफुया ,
पर्जन्याचा मंत्र म्हणुया ....
वापि कूप तडागानाम्
समुद्र गच्छ स्व: ।
टप..टप मोती वेचुया...
धान सूप नाचवुया ।
जय अंबे !!!!
🙏 उन्नती गाडगीळ 🙏
मंगलमाते तुज नमन करते,
खेळ आगळा मांडते ।
फुगडी माझी फुकाची,
सर येवो मोत्यांची ।
पाट बाई पाट,निळा नाीळा पाट ,दुष्काळी ढगांची गर्दी दाट ।
सई बाईचा कोंबडा,आला दारी,
गोणीत नाही दाणा,।
बाड़ी त नाहीं पाणी।
कुकुsssच्ssकु...
झिम्मा ग पोरी झिम्मा...
फाटा नाहीं चुलीला...
पैका नाहीं गाठीला ।
भांडण भू... आकाशाचं,
मांडते तुझ्या दारात ।
नाच ग घुमा नाच !
शेतकरी रडे मनात,
पिकं जळे शिवारात ।
नाचू मी कशी ?
पिंगा ग पोरी पिंगा
दहशतवादाचा दंगा ।
एक दिलाने गोफ गुंफुया ,
पर्जन्याचा मंत्र म्हणुया ....
वापि कूप तडागानाम्
समुद्र गच्छ स्व: ।
टप..टप मोती वेचुया...
धान सूप नाचवुया ।
जय अंबे !!!!
🙏 उन्नती गाडगीळ 🙏
Comments
Post a Comment