सुश्रुत बनुया..💐

श्री. व्यासांच्या ओजस्वी वाणीतून अविरत स्त्रवणारा तेजस्वी शब्द न् शब्द आपल्या कर्णात साठवत श्री. गणेशाने अगाध दान ... मानवाच्या झोळीत घातले. .. ही कथा सर्वश्रृत आहे .. प्रज्ञाचक्षूचा विकास करण्याचे ' श्रवण ' हे माध्यम आहे हा मंत्र स्वकृतीतून दिला . अन् आपण .. तना मनाची तद् रुपता दाखवणा-या गणाधिपती समोर कर्णकर्कश्य संगीत लावतो ! ध्वनि प्रदूषण करतो ! किती विरोधाभास! सध्या बाल वयातच कर्णदोष , दृष्टि दोष फोफावत आहेत,निर्जीव यंत्राचे कर्णकटु संगीताचा संस्कार बालकांच्या कानावर न करता सजीव निसर्गातील ताल.. लयबद्धता ग्रहण करणे ... आकलन करणे ... दाद देणे ... श्रवण तंत्र विकसित करुन यशस्वी जीवन मार्ग मुलाना दाखवुया
ध्वनि प्रदूषण टाळुया .. सुश्रृत बनुया ... श्रावण ऋतु ने सुबत्ता दान दिले..
भाद्रपद विद्वत्ता अंगा खांद्यावर घेऊन येतो . आपण अंगिकारुया ...
चला तर सुश्रृत बनुया
वर्धितत करुया ... भादवाचा गोडवा ...  कान तयार करुया ..
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme