प्र.के.अत्रे..भेट..
शिरीष पै. यांचे पिताश्री हे स्टेडियम वर आले होते.
त्यांना काहीतरी दैवी सिद्धी प्राप्त होती.
त्यांच्या रुममध्ये मी,आई,आजी,आजोबा नमस्कारासाठी गेलो होतो.
आम्ही नमस्कार केल्यानंतर.. ते कोपऱ्यात भिंती कडे तोंड करून उभे राहिले. व जोरदार आवाजात संवाद सुरू झाले..
एकटेच ..बोलत होते असे मला वाटले
पण.. ते प्रत्यक्षात श्री. गणेशाशी बोलत होते.
असे ते म्हणाले.
जसजसे माझे वय वाढत गेले.. त्यांचा जीवन परिक्षण करता..
त्यांचा आवाका, अनेक क्षेत्रातील प्रभूत्व, भारदस्त व्यक्ती मत्व , बौद्धिक क्षमता. उत्तुंग झेप बघताना, खरचं त्यांचे गणेशाशी.. बुद्धी दात्याशी अलौकिक नातं असावं, याची मला खात्री पटत गेली. निव्वळ थोतांड नव्हते.
विशेषतः संयुक्त महाराष्ट्र चळवळीत..
त्यांच्या लेखणीतून अक्षरशः ठिणग्या उडाल्या.
1मे 1960 मी अल्पवयीन होते. पण कळत्या वयात अत्र्यांचे समग्र वांड्गमय वाचले तेव्हा.. अंग थरारले.अन् श्री. गणेशाचे व त्यांचे नातं उमगलं.
मी स्वतः ला खूपच भाग्यवान समजते की मला त्यांचा भरभरून .. पाठ थोपटून आशीर्वाद मिळाला. जुजबी संवाद ही साधता आला.
अशीच क्रुपा द्रुष्टी श्री. गणेशाची आपल्यावर रहो हीच प्रार्थना..
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment